शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

स्टेट बँक विलिनीकरणाविरोधात लातुरात बँक कर्मचा-यांचा मोर्चा

By admin | Updated: February 28, 2017 14:56 IST

स्टेट बँकेच्या विलिनीकरणाविरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या राष्ट्रीय संपाच्या निमित्ताने लातूर मधील बँक कर्मचारी अधिकार्‍यांनी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 28 - स्टेट बँकेच्या विलिनीकरणाविरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या राष्ट्रीय संपाच्या निमित्ताने लातूर मधील बँक कर्मचारी अधिकार्‍यांनी मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या मोर्चात बँक ऑफ महाराष्ट्र, मिनी मार्केट- हनुमान चौक- गुळ मार्केट, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद अशा बँकेच्या कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला. आंदोलक बँक कर्मचार्‍यांपुढे बोलताना कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले की, स्टेट बँक विलीनीकरणाचा निर्णय हा आपला कर्मचा-यांचा विरोध डालून सरकार मुजोरपणे घेत आहे. 
 
या पाच बँकांच्या विलिनीकरणानंतर इतर बँकांच्या विलिनीकरणाचा रेटा वाढेल. शेतकर्‍यांची कर्जे उत्तर प्रदेशात माफ करतो म्हणणारे मोदी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जे माफ करत नाहीत. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर काढतो म्हणणारे मोदी नेमके किती पैसा बँकेत परत आला ते सांगण्यास धजावत नाहीत. हा एक मोठा फ्रॉड आहे. या दरम्यान जवळपास एकशे दहा जणांचे बळी गेले. त्यांना अजुन नुकसान भरपाई मिळाली नाही. गोव्यात जावून बँक कर्मचार्‍यांची स्तुती करणारे पंतप्रधान जादा कामाचे पैसे मात्र देत नाहीत. 
 
नोटाबंदीमुळे एक लाख दहा हजार कोटींचे नुकसान बँकांना सहन करावे लागले. त्याची भरपाईसुद्धा हे सरकार देत नाही. मोठ्या कर्जदारांनी दहा लाख कोटी एवढे बँक कर्ज बुडविले आहे. त्याचा वसुलीसाठी हे सरकार कायदा करीत नाही.  कामगार कायदे भांडवलदार धार्जिणे बनवले जात आहेत. त्यामुळे येणार काळातील प्रखर संघर्षास सिद्ध रहा, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, या संपात आज बँकांनी सहभागी होत जवळपास ८०० कोटींचा व्यवहार ठप्प केला. बँकांच्या सात संघटनांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील स्टेट बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्वच शाखा बंद होत्या.
 
या आंदोलकांना कॉ. प्रशांत धामणगांवकर, व कॉ. उमेश कामशेट्टी यांनी ही संबोधित केले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उत्तम होळीकर, कॉ. दीपक माने, कॉ. उदय मोरे, कॉ. राजेंद्र दरेकर, कॉ. पवन मोटे, कॉ. किशोर चंदन, कॉ. नारायणकर, कॉ.इबीतवार, कॉ. सरस्वती हेड्डा, कॉ. मेघा मयुरी, कॉ. भावना पटले, कॉ. प्रतिमा जगताप यांनी केले. मोर्चात जवळपास २०० कर्मचारी अधिकारी सामील झाले होते.