जळकाेट तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन ते जळकाेटमध्ये दाखल झाले. यावेळी ते बालेत हाेते. राज्यमंत्री बनसाेडे म्हणाले, मी जनतेचा मालक नसून सेवक आहे. माझ्या पदाचा वापर सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हाेईल. जळकोट तालुका मराठवाड्यात एक आगळावेगळा तालुका करून दाखविताे. ताेपर्यंत गप्प बसणार नाही. जळकोट शहरातील अंतर्गत रस्ते, मशिद, समशानभूमी संरक्षक भिंत, खंडोबा देवस्थान, बुद्धविहार, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे संस्कृतिक सभागृह, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. जळकाेटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. जळकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन आणि नव्याने मंजूर होत असलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन होणार आहे. शिवाय, प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन लवकर करण्यात येईल, असेही राज्यमंत्री बनसाेडे म्हणाले.
जळकाेट तालुक्यातील केकतसिंदगी गावाला राज्यमंत्री बनसाेडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, नगरसेवक महेशभाऊ शेटे, राजकुमार डांगे, चेअरमन अशोक डांगे, गोविंद ब्राह्मणा, धनंजय ब्रह्मणा, श्याम डांगे, दस्तगीर शेख, पाशा शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील साळवे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील लासुरे, माजी उपसभापती गोविंद माने, गजानन दळवे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, विठ्ठल चंदावार, डॉ. तानाजी चंदावार, उमाकांत देशमुख, रमेश देशमुख, गोपाळकृष्ण गव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.