नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत आठ सदस्य निवडून आले होते. दरम्यान, आज प्रशासनाच्या आदेशानुसार सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक घेण्यात आली. त्यात सरपंचपदासाठी बबिता घोडके आणि भीमा रामा कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. तर, उपसरपंचपदासाठी साेनाली मुळे आणि अनसूया दत्तू कोरे यांनी अर्ज दाखल केला होता. चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडून आलेल्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. घोडके व मुळे यांना ५ मते मिळाली, तर भीमा कांबळे व अनसूया कोरे यांना ३ मते मिळाल्याने घोडके व मुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी शैलेंद्र बिराजदार यांनी काम पाहिले. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांंसह ग्रामसेवक श्रीकांत बनकर, तलाठी राजेंद्र संपत्ते, बाबासाहेब घोडके व नागरिक उपस्थित होते.
सलग दुसऱ्यांदा संधी
बबिता घोडके या मागील काळातही सरपंच होत्या. यावेळी सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले असतानाही त्यांनाच परत एकदा संधी मिळाली आहे.