जिल्हा आराेग्य विभागाच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपर्यंत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानात आधार फाउंडेशनने सहभाग घेतला आहे. फाउंडेशनतर्फे क्षय व कुष्ठरोग या आजारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रकांची निर्मिती करण्यात आली असून त्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल आनेराव, डॉ. हेमंत कुमार साळुंखे, मोहसीन अब्रार, पांडुरंग गोलमालु यांची उपस्थिती होती. कॅप्शन : आधार फाउंडेशनच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोगाविषयी जनजागृती करणा-या माहितीपत्रकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. गंगाधर परगे, प्रवीण पाटील, डॉ. राहुल आनेराव, डॉ. हेमंत कुमार साळुंखे, मोहसीन अब्रार, पांडुरंग गोलमालु यांची उपस्थिती होती.
क्षय, कुष्ठरोग आजारांसाठी जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST