आर्वी येथे नालेसफाई, पथदिवे पूर्ववत
लातूर : शहरालगतच्या आर्वी ग्रामपंचायत हद्दीत नागरी समस्या निर्माण झाल्या होत्या. याबाबत पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आर्वी येथे नालेसफाई मोहीम राबविली जात असून, पथदिवे पूर्ववत करण्यात येत आहेत. नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या होत्या.
लातूर शहरात माठांना मागणी वाढली
लातूर : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून, गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मागणी वाढली आहे. शहरातील दयानंद गेट, गूळ मार्केट परिसर, गंजगोलाई, आदी भागांत विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी आले आहेत. १५० ते ३०० रुपयांपर्यंत माठांचे दर असून, खरेदीला पसंती दिसून येत आहे. उन्हाचा पारा वाढेल तशी माठांना मागणी वाढेल, अशी माहिती माठ विक्रेत्यांनी दिली.
महाराष्ट्र जोशी समाज समितीची बैठक
लातूर : महाराष्ट्र जोशी समाज समिती प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी संस्थापक-अध्यक्ष दिलीप परदेशी, सचिन भोसले, उपाध्यक्ष शिवाजी जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदेश पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲड. रणजित भोसले, काकासाहेब चौगुले, विकास भोसले, प्रा. अर्जुन भोळे, विष्णू गरड, श्याम भोळे, काकासाहेब भघाडे, भागवत गरड, अर्जुन भोसले, अविनाश भोळे, पवन चौगुले, ज्ञानेश्वर भोसले, तानाजी भोसले, बसवंत भोळे, महेश चौगुले, बाळासाहेब चौगुले, व्यंकट भोसले, अशोक भोळे, गोविंद भोळे, बजरंग भोसले, राघू भोसले, सुरेश भोळे, मधुकर भोसले, भागवत घावीट, हणमंत भगाडे, कृष्णा भगाडे, आप्पाराव भोळे, विकास भोळे उपस्थित होते.
महापालिकेच्या क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा
लातूर : शहर महापालिकेच्या क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी आढावा घेतला व संबंधितांना सूचना केल्या. शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावेळी नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ. सतीश हरिदास, डॉ. महेश पाटील यांची उपस्थिती होती.
प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम
लातूर : शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात मंगळवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार यांनी सांगितले. यावेळी आदित्य लातूरकर, आकाश पतंगे, अभियंता सोमवंशी, लेखाधिकारी माने, दहिफळे, कराड, राठोड, शेलारे, गोसावी, बेद्रे, देशपांडे, कुसुमले, सोनवणे, शेकडे, भोईनवाड, आदींची उपस्थिती होती.
शोभा माने यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार
लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त सर फाउंडेशनच्या वतीने शिक्षिका शोभा माने यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसीजन अध्यक्ष सुवासिनी शहा, उपसंचालक कमलादेवी औटे, शीलाताई पत्की यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. या यशाबद्दल राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, सतीश सातपुते, कमलाकर सावंत, आदींनी कौतुक केले आहे.
महाकृषी ऊर्जा पर्वात सहभागी होण्याचे आवाहन
लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या वतीने महाकृषी ऊर्जा पर्व राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी सवलत दिली जात आहे. महावितरणचे महाव्यवस्थापक भरत जाडकर, सहायक अभियंता राहुल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पथकाच्या वतीने ग्राहकांच्या जोडणीची तपासणी करण्यात येत आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांची उपस्थिती होती.
‘स्वच्छ ग्राम - हरित ग्राम’ विषयावर प्रशिक्षण
लातूर : नेहरू युवा केंद्र, लातूर यांच्या वतीने ‘स्वच्छ ग्राम - हरित ग्राम’ या विषयावर बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान सभागृहात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, साक्षी समय्या, डॉ. संजय गवई, डॉ. पवन लड्डा, संजय ममदापुरे, विकास काळे, इम्रान पटेल, सोनम आरदवाड, प्रवीण कोरे, चंदन टाळकुटे, बालाजी शेगसारे, अमोल आवाळे, प्रियंका मामडगे, अरविंद आरदे, नीलेश माडजे, श्याम बोराडे, आदींची उपस्थिती होती.