येथील श्री हावगीस्वामी वीरशैव लिंगायत भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री गुरू हावगीस्वामी मठाचे मठाधीश डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार मनोहर पटवारी, गोविंद केंद्रे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, बसवराज पाटील नागराळकर, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शिवाजीराव मुळे, मंजूरखाँ पठाण, ताहेर हुसेन, समीर शेख, सुभाष धनुरे, बाबूराव पांढरे, बाबूराव समगे, रेखाताई कानमंदे, उषा कांबळे, उत्तरा कलबुर्गे, अनिता बिरादार, शीलाताई मालोदे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आ. मनोहर पटवारी, गोविंद केंद्रे, राजेश्वर निटुरे, सिद्धेश्वर पाटील, शिवाजीराव मुळे यांची समयोचित भाषणे झाली. श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधीश डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले.
विकासासाठी जास्तीत जास्त निधी...
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. निधी वाटप करताना समाजातील सर्वच घटकाच्या शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचविण्याची दक्षता घेणार आहे. लिंगायत भवन निर्मितीचा शब्द निवडणूक काळात दिला होता. त्या आश्वासनाची पूर्तता आज होत असल्याने आनंद होत आहे.