शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा मोर्चा, धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: October 23, 2023 19:45 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी

लातूर: कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी गटप्रवर्तकांनी तर ऑनलाईन कामे करण्यासाठी होत असलेली सक्ती त्वरित थांबवावी या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हाध्यक्ष रंजना गारोळे, जिल्हा सचिव रेणुका सिंदाळकर यांच्यासह जिल्ह्यातील गटप्रवर्तक, अशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनास टाऊन हॉल येथून प्रारंभ झाला. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित प्रवास खर्च मिळतो. प्रवास खर्चाव्यतिरिक्त त्यांना मासिक निश्चित रक्कम द्यावी. गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामे विनामोबदला सांगण्यात येऊ नयेत. गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी एक महिन्याच्या मानधनाएवढा बोनस देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.ऑनलाईन कामे सांगू नयेत...

आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नयेत. ऑक्टोबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केली नाही. ती वाढविण्यात यावी. मासिक २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे. आरोग्यवर्धिनीअंतर्गत केलेल्या कामाच्या मोबदल्याची थकबाकी आशा स्वयंसेविकांना त्वरित द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना देण्यात आले.

टॅग्स :laturलातूर