शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, डोळ्यामागील विचारदृष्टी नव्हे:  नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:19 IST

समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे.

- धर्मराज हल्लाळे/दुर्गेश सोनार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते. डोळ्यामागे दडलेली विचारदृष्टी नष्ट करू शकत नाही. ही दृष्टी देण्याचे काम साहित्य करते. त्यात वैचारिक मतभेद असू शकतील, पण मनभेद नको, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले. 

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी गडकरी म्हणाले, समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे. साहित्यिकांनी कोणत्या विषयावर लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, लेखन उद्दिष्ट काय याचाही विचार व्हावा. साहित्य जर राष्ट्रानुकूल, युगानुकूल असेल तरच देश जगाला मार्गदर्शन करू शकेल. 

‘समता व शौर्य ही महाराष्ट्राची ओळख’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.  राष्ट्रपतींनी संदेशाची सुरुवात मराठीतून केली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरेचा दाखल देत त्यांनी संत तुकारामांचा अभंगही सादर केला.

राजकारणावर बोलू नये...शिक्षण, साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारणावर बोलू नये. राजकारणी साहित्य जाणणारा असेल तर त्याचे प्रतिबिंब धोरणात उमटते, हे सांगताना गडकरी यांनी सुधाकरराव नाईक, श्रीकांत जिचकार यांचा उल्लेख केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६२ गावांतील जनतेच्या कुचंबणेचा मुद्दा पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री बनसोडे यांनी मांडला. नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले तेव्हा, सीमा प्रश्नावर घोषणाबाजी झाली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlaturलातूरliteratureसाहित्य