५३४ रुग्णांना मिळाली सुटी
एकूण ८६ हजार ९८५ रुग्णांपैकी ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी ५३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७६, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १९, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ७, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २२, औसा ग्रामीण रुग्णालयातील २, कासारशिरसी येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४३, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील २, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, सामाजिक न्याय भवन लामजना येथील ३, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील २६ अशा एकूण ५३४ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के
आतापर्यंत ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे.