विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १ हजार ५८८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ५७७ पॉझिटिव्ह आढळले असून, प्रलंबित अहवालापैकी १०५ बाधित आहेत. प्रयोगशाळेतील चाचणीत एकूण ६८२ रुग्ण आढळले असून, रॅपिड अँटीजन टेस्ट ३४३१ जणांची करण्यात आली. त्यात ९८१ रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून १६६३ रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या १३ हजार ८५८ रुग्णांपैकी १९२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. ४४ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. १०२ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, ९५१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ५९४ रुग्ण मध्यम विना ऑक्सिजनवर असून, १२ हजार १६७ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.
७७५ जणांनी केली कोरोनावर मात
प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे ७७५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ६४२, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ५९, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील २२, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील २९ अशा एकूण ७७५ जणांचा समावेश आहे.