काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यात शहराध्यक्ष पप्पू शेख, भागवत फुले, सलीमभाई तांबोळी, सीताराम मोठेराव, गंगाधर केराळे, सुनील दांडगे, बाळू इरवाने, अनिल महालिंगे, सचिन चाकूरकर, सुनील शिंदे, गफुर मासुलदार, रणजित पाटील शेळगावकर, तौसिफ शेख, अविनाश गोलावार, शेख अझहर, वाजीद सौदागर, अझहर सौदागर, इम्रान शेख, शकिल गुळवे, भारत राठोड, बालाजी मोठेराव, रवि नाईकवाडे, योगेश भोसले, दिनेश फुले, शंकर मोरे, मनोज सोमवंशी, अजझर सय्यद, शेख अहमद, उबेद शेख आदी सहभागी झाले आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार बालाजी चितळे यांना देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होऊनही केंद्र सरकार इंधन दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेल ९२ रुपये लिटर्स झाले आहे. गॅसची किंमत ८५० रुपये झाली आहे. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात आली.