शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शासकीय सेवेत समायोजन करावे; एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: November 1, 2023 18:13 IST

जिल्हा परिषदेसमाेर ठिय्या : लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानअंतर्गत ग्रामीण रुग्णालयापासून ते आरोग्य उपकेंद्रापर्यंतच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करुन घेण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गतचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी व एएनएम यांचे बुधवारी चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुुरु होते. तसेच महाराष्ट्र राज्य समुदाय अरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीनेही तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु होते.

नऊ आरोग्य संघटनांकडून काम बंद...राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना, आर.बी.एस.के. कॉन्ट्रॅच्युअल मेडिकल ऑफिसर युनियन, राष्ट्रीय आरोेग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना, कंत्राटी औषध निर्माता कृती समिती, महाराष्ट्र राज्य अस्थाई कुष्ठरोग तंत्रज्ञ असोसिएशन, कास्ट्राईब असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी कल्याण संघटनेचा समावेश आहे.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल