शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

सर्वशिक्षा अभियानातील ८३ कर्मचाऱ्यांचे समायोजन

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

लातूर : सर्वशिक्षा अभियानांर्तगत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती व समायोजित विशेष तज्ञ असे ८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने

लातूर : सर्वशिक्षा अभियानांर्तगत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती व समायोजित विशेष तज्ञ असे ८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने १ आॅक्टोबरपासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत केले आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाबुगिरी संपुष्टात आली आहे़ आता डाएटकडे गेलेल्या या तज्ज्ञांकडे शाळाभेटी व प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे़ ही बाब लक्षात घेवून केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यानुषंगाने राज्यात सध्या ३३ जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये मुबंई व उपनगरे वगळून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत़ याच संस्थात अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शिक्षा अभियानामध्ये ग्रामीण क्षेत्रात पंचायत समिती व शहरी क्षेत्रात महानगरपालिकेतंर्गत राज्यातील ४०७ गट शहर साधन केंद्रातील २,०३१ विषय साधन व्यक्तींच्या याअंतर्गत लातूर जिल्हातील ६१ विषय साधन व्यक्ती व राज्यातील विशेष तज्ञ ८१४ यातंर्गत लातूर जिल्ह्यातील विशेष तज्ञ समायोजितांची सेवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वर्ग करण्यात आली आहे़ त्यामुळे आता यासर्व ८३ कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन व भत्ते महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या कार्यालयाच्या नियमानुसार व तरतुदी नुसार होणार आहेत़ यापूर्वी या कर्मचाऱ्यांना केवळ बाबुगिरीचे काम करावे लागत होते़ ते कामे संपून आता या सार्वांना शाळाभेटी, शैक्षणिक चर्चा सत्र, प्रशिक्षण यांना उपस्थित राहण्यासाठी शैक्षणिक कामकाजाचे मासिक नियोजन करुन गट व शहरातील साधन केंद्रांतर्गत शाळांना शैक्षणिक मार्गदर्शन करुन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे विशेष प्रयत्न करणार आहेत़ (प्रतिनिधी)