३१ जणांनी केली कोरोनावर मात...
शुक्रवारी जिल्ह्यातील ३१ रुग्णांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, एक हजार मुलांचे वसतीगृह १२ नंबर पाटी येथील ७ तर होम आयसोलेशनमधील ११ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ७३६ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ६४९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर ९० हजार ४८४ जणांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी १४ हजार ३६१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वॅब आणि रॅपिड ॲन्टीजन चाचण्यांवर अधिक भर दिला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.