विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी एक हजार ५९६ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात ९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, एक हजार ५७९ व्यक्तींची रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १८५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून २८४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ७१ हजार २६१ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात २७ हजार ९२२ बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.३ टक्के आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्णदुपटीचा कालावधी २५४ दिवसांवर असून, मृत्युदर २.७ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
७२ जणांना मिळाली सुटी...
शनिवारी ७२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये सामान्य रुग्णालय उदगीर येथील १, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह येथील ७, खाजगी रुग्णालय २ तर होम आयसोलेशनमधील ६१ जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.