९९८ रुग्णांना सुटी
प्रकृती ठणठणीत झाल्याने ९९८ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ६४२, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १६, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ११, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ६, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथील प्रत्येकी २, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथील ६, किल्लारी ग्रामीण रुग्णालयातील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ८७, दापका कोविड केअर सेंटरमधील १८, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, बावची कोविड केअर सेंटरमधील ४, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ८५, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३० अशा एकूण ९९८ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर
रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२५ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के आहे.