...
शेतशिवारात आग; दोन लाखांचे नुकसान
जळकोट : तालुक्यातील डोंगरकोनाळी शिवारात बुधवारी रात्री अचानक आग लागून ७ शेतकऱ्यांचा कडबा, गुळी, गोठा जळून दोन लाखांचे नुकसान झाले. या आगीत संगम टाले, व्यंकट मिरजगावे, संभाजी टाले, शिवाजी टाले, पिराजे शिंदे, आण्णाराव करंजे, महारुद्र करंजे यांचे नुकसान झाले आहे.
...
आरोग्य, पोलीस क्षेत्रातील महिलांचा सत्कार
निलंगा : महिला दिनानिमित्त निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, महिला व निलंगा पोलीस उपविभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाजपा युवती मोर्चाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रणिता केदारे, सुनंदा पाटील, अनिषा सूर्यवंशी, संजना सूर्यवंशी, हेमा कांबळे, सीमा कांबळे, शिल्पा काळे, ऐश्वर्या मोहळकर, निकिता भोसले आदी उपस्थित होत्या.
...
पोहरेगाव- सिंधगाव शिवरस्ता काम सुरू
रेणापूर : तालुक्यातील पोहरेगाव- सिंधगाव शिवरस्त्याच्या माती कामाचा प्रारंभ तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी सरपंच गंगासिंह कदम, रमाकांत कुलकर्णी, तलाठी भोसले, ग्रामविकास अधिकारी महादेव कांबळे, दिगंबर अंकुश, किशनबप्पा निरपणकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
...
रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे
रेणापूर : उमरगा- खामगाव जाणारा महामार्ग खरोळा फाटा ते पानगावपर्यंत शेतकऱ्यांनी मावेजासाठी अडविला आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकून बुजविण्यात आले. हा रस्ता पानगावातून जात असल्याने रस्त्यावरून वाहन धावले की धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी पानगाव व्यापारी असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.