शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: November 7, 2024 17:17 IST

अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला होता.

वाढवणा बु. (जि. लातूर) : नांदेड-बिदर महामार्गावर एकुर्का रोड येथे टेम्पो व कारचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आई, दोन विवाहित मुली व एका नातीसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. मृतात मंगलबाई गोविंदराव जाधव (वय ४८ रा. एकुर्का रोड), प्रतिभा संजय भंडे (वय २४ रा. दावणगाव, ता. उदगीर), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २६ रा. होनाळी), अन्यया रणजित भंडे (रा. दावणगाव) यांचा समावेश आहे.

एकुर्का रोड येथील जाधव कुटुंबिय जावयाची कार (एम.एच. ०२ बी.एम. ४४८२) घेऊन उदगीर येथे खरेदीसाठी जात होते. यावेळी नांदेड-बिदर महामार्गावर उदगीरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पो (एम.एच. २४ ए.यू. ४७५६) ने एकुर्का रोडजवळील मारुती मंदीर घाटात कारला समोरुन जोराची धडक दिली. यात कारमधील मंगल गोविंदराव जाधव, ज्योती भंडे, प्रणिता बिरादार आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य जखमींना उपचारांसाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात