शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात कट्ट्यावर जोपासला जातो वाचन छंद; मनपाच्या अनोख्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

By हणमंत गायकवाड | Updated: October 11, 2023 19:17 IST

वाचाल तर वाचाल, लातूर शहरात आठ ठिकाणी वाचन कट्ट्याची सोय

लातूर : वाचनाचा छंद असलेल्या व्यक्ती दैनंदिन आयुष्यात अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग काढण्यात माहीर असतात. त्यामुळे भरपूर वाचन करायला हवे. वाचाल तर वाचाल... असा संदेशच जणू महानगरपालिकेने लातूरकरांना दिला आहे. शहरातील चार झोनमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ वाचन कट्टे तयार करण्यात आले आहेत.

दररोज २०० या प्रमाणे सहा हजार जणांनी या  कट्ट्यावर जाऊन वाचन छंद जोपासला आहे. समाजात मोबाइल, इंटरनेटचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे अनेकांनी वाचनाच्या सवयीला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्या खूप कमी लोक पुस्तकं वाचतात. इंटरनेट आणि मोबाइलमुळे वाचनाची सवय कमी झाली आहे.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासात पडते भर... वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे महानगरपालिकेने वाचन कट्टे तयार केले आहेत. ए, बी, सी आणि डी अशा चार झोनमध्ये प्रत्येकी दोन वाचन कट्टे आहेत. त्या कट्ट्यावर वेगवेगळे मॅगझिन आणि वर्तमानपत्रे असतात. या उपक्रमाला ज्येष्ठांसह तरुणांचाही प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात सहा हजार लोकांनी वाचन कट्ट्यावर वर्तमानपत्रांसह मॅगझिन वाचले आहेत. वाचन कट्ट्यावर प्रारंभी ज्येष्ठांचीच रेलचेल होती. पण आता तरुणांचीही भर त्यात पडत आहे. वाचनाचे फायदे ज्येष्ठांकडून तरुणांना सांगितले जात असल्यामुळे वाचकांची संख्या वाढत आहे.  

या ठिकाणी आहेत वाचन कट्टे... ए झोनमध्ये सोहेलनगर, मुंदडा डेअरी परिसर     बी झोनमध्ये नाना-नानी पार्क, एसटी वर्कशॉप   सी झोनमध्ये बाभळगाव चौक परिसरातील शिक्षक कॉलनी, दसरा मैदान ग्रीन बेल्ट डी झोनमध्ये टागोरनगर, बसवेश्वर चौक परिसर

वाचन कट्ट्यावर वर्तमानपत्रे...वाचनाची गोडी लावण्यासाठी महापालिकेने वाचन कट्टे तयार केले आहेत. शहरातील चारही झोनमध्ये प्रत्येकी दोन असे आठ कट्टे असून, त्या ठिकाणी वेगवेगळे दहा वर्तमानपत्रे आणि काही पुस्तकांचा समावेश असतो.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाliteratureसाहित्य