शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना'

By हणमंत गायकवाड | Updated: April 4, 2023 17:35 IST

१५ एप्रिलपासून सेवा : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

लातूर : गोरगरिबांच्या सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धनी केंद्र सुरू होत आहेत. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित होणार आहे. आरोग्यवर्धनी केंद्र आणि आपल्या दवाखान्यासाठी इमारती भाड्याने घेतल्या असून मनुष्यबळासह यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ १ मे पासून होत असला तरी जिल्हास्तरावरील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

१८ आरोग्यवर्धन केंद्र नगरपालिका क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहेत. तर दहा ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल. १ मे रोजी एकाच वेळी ही सर्व २८ केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग गतीने कामाला लागला आहे. कामगार दिनापासून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा शासनाने जाहीर केले असले तरी १५ एप्रिलपासून लातूर जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होतील. मनुष्यबळाची भरती, दवाखान्याची इमारत, यंत्रसामुग्री याबाबतची सर्व तयारी झाली आहे. पुढील आठ दिवसांमध्ये औषधे व अन्य साहित्याची खरेदी होणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्यसेवा....आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक डॉक्टर, नर्स, दोन शिपाई अशी पदे भरण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या संस्थांच्या धर्तीवर सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्यवर्धिनी केंद्रातून होणार आहे.

इथे असेल आपला दवाखाना.....लातूर शहर, अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट आदी ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत आहे.

लातूर शहरांमध्ये ११ आरोग्यवर्धन केंद्र...लातूर शहरामध्ये एक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ११ आरोग्यवर्धन केंद्र असतील. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागअंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्राचे कामकाज असेल. लातूर मनपाकडून शहरातील आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये १० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि १८ ठिकाणी आरोग्यवर्धनी केंद्र सुरू होत आहेत. या केंद्रांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १५ एप्रिलपासून सेवा सुरू होईल. १ मे रोजी या केंद्राचे डिजिटल उद्घाटन होणार आहे. पदभरती आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. औषधी खरेदी आठ दिवसांत होईल.- डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल