शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा

By हरी मोकाशे | Updated: January 4, 2024 17:35 IST

शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत.

लातूर : वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक, शारीरिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना आरोग्यविषक संवाद साधता यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दर गुरुवारी आरोग्य सन्मान मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांची मोफत आरोेग्य तपासणी करुन औषधोपचार, मार्गदर्शन केले जाणार आहे.

सध्या समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वाढत्या वयानुसार ज्येष्ठांमध्ये व्याधी वाढतात. ग्रामीण भागातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळाल्याने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सन्मान मेळावा, शिबीर घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या मेळाव्यासाठी प्रत्येक शिबिराच्या पहिल्या दिवशी शाळा, ग्रामपंचायत, आशा यांच्यामार्फत जाणीवजागृती केली जाणार आहे. शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत.

७५ वर्षे पूर्ण होणाऱ्या आजी- आजोबांचा सत्कार...दर गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात हे शिबीर होणार आहे. यात डोळे, कान- नाक- घसा, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग याबाबतच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. ज्येष्ठांना जास्तीत जास्त बोलते करुन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ७५ वर्षे पूर्ण होणाऱ्या आजी- आजोबांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच कोणतेही व्यसन नसलेल्या आजी- आजाेबांचा सत्कार करण्यात येणार आहे.

योजनांचीही माहिती दिली जाणार...ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषक समस्या सोडविण्याबरोबरच शासनाच्या इतर सामाजिक योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेबरोबर योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्हास्तरीय मोहिमेचे पाखरसांगवीत उद्घाटन...आरोग्य सन्मान मेळाव्याच्या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन पाखरसांगवी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात गुरुवारी झाले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा परिषदेेचे प्रभारी सीईओ असलम तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद बिलापट्टे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा वाघमोड आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसेच योगाचे प्रात्यक्षिक झाले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या आजी- आजोबांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदSenior Citizenज्येष्ठ नागरिक