शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लातूर : औशाच्या इज्तेमात ८० हजार समाजबांधवांचा सहभाग

By आशपाक पठाण | Updated: December 5, 2022 21:48 IST

शांतता, शिस्त अन् संयमाचा संदेश, ७०० स्वयंसेवक कार्यरत

लातूर : आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासणे आवश्यक असून, विश्वशांतीची गरज आहे. मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश देण्याबरोबर कुरआनच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी औसा येथे आयोजित इज्तेमात पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत जवळपास ८० हजारांहून अधिक समाजबांधवांनी उपस्थिती लावली. 

कोविडच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय होत आहेत, त्यासाठी ४० एकरावर बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत इज्तेमास्थळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित झाल्याने परिसर गर्दीने फुलला आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, आपल्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये, यासाठी औसा शहरापासून इज्तेमास्थळापर्यंत जागोजागी स्वयंसेवक उभे आहेत. प्रत्येक वाहनधारकांना मार्ग दाखविण्याचे काम करीत सावकाश जाण्याचा सल्ला देणारे तरुण प्रेम आणि आपुलकी दाखवित आहेत. इज्तेमास्थळी दोन ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे. शिवाय, उपस्थित बांधवांना अत्यंत माफत दरात दर्जेदार जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय, इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी औसा शहरातील बसस्थानक, टी पॉईंपासून मोफत सोय करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक, धर्मगुरू कुरआन, हदीसवर बयाण (प्रवचन) करीत आहेत.

दवाखाना, रुग्णवाहिकेची सोय...इज्तेमास्थळी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. शिवाय, रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरही सेवा देत आहेत. हजारो नागरिक उपस्थित असतानाही कोणालाही त्रास होणार नाही, यासाठी शेकडो स्वयंसेवक काळजी घेण्याचे काम करीत आहेत. संयोजकांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मिठाई, कपडे, अत्तरांचा सुगंध...इज्तमास्थळी विविध प्रकारच्या खजूर, मिठाई, उबदार कपड्यांची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत. शिवाय, अत्तर, सुरमा, टोपी, मिस्वाकचीही दुकाने आहेत. इज्तेमासाठी औसा बसस्थानक किंवा टी पॉईंट आलेल्या नागरिकांना इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूर