साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी
अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन
सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अशोक पोद्दार
यांनी आतापर्यंत १२४ मोफत उपचार शिबिरे घेतली आहेत. दरवर्षी पाणपोई, सीएमई , गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करतात. तसेच ऑर्थोपेडिक असो., महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो., रोटरी क्लब, आयएमए, दिशा
प्रतिष्ठान, आशादीप, लातूर क्लब आदी विविध सामाजिक संघटनांच्या
माध्यमातून त्यांचा सामाजिक उपक्रमात सहभाग आहे. रुग्णालयात असलेल्या अद्ययावत सुविधांमुळे रुग्णांची सोय झाली आहे. अतिशय गुंतागुंतीच्याही शस्त्रक्रिया रुग्णालयात केल्या जात असल्याने रुग्णांच्या मुंबई, पुण्याला जायची गरज राहिली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, रुग्णसेवेसोबतच सामाजिक कार्यात सहभागी असलेले डॉ. अशोक पोद्दार यांच्या अत्याधुनिक रुग्णालयामुळे लातूरकरांची सोय झाली आहे. दरम्यान, वर्धापन
दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटलच्या वतीने अस्थिरोग तपासणी, डिजिटल एक्स-
रे , रक्त तपासणी, फिजिओथेरपी, ऑपरेशनकरिता ५० टक्के तर एमआरआय, सीटी
स्कॅन, यूएसजी करिता रुग्णांना २५ टक्के सूट देण्यात आली होती. याचा अनेक
रुग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी,
डॉ. सुरेखा काळे, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. चेतन सारडा,
अभिजीत देशमुख, राजेश सोमाणी, प्रसाद उदगीरकर, जयेश बजाज, लक्ष्मीकांत
कर्वा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.