रेणापूर तालुक्यात सर्वाधिक मतदान...
लातूर तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींसाठी ७६.५५, औसा ४५ ग्रा.पं.साठी ७९.३९, रेणापूर २७ ग्रा.पं.साठी ८३.५२, उदगीर ५५ ग्रा.पं.साठी ८०.७४, अहमदपूर ४२ ग्रामपंचायतीसाठी ७९.७५, चाकूर २२ ग्रामपंचायतीसाठी ७६.०६, जळकोट २६ ग्रा.पं.साठी ८०.७२, निलंगा ४४ ग्रा.पं.साठी ७७.४४, देवणी ३३ ग्रा.पं.साठी ७८.५० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ७९.३४ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये रेणापूर तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.
प्रत्येक मतदारांची थर्मल गनद्वारे तपासणी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रांवर येणाऱ्या प्रत्येक मतदारांची आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत थर्मल गनद्वारे तपासणी केली जात होती. केंद्रातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हँडग्लोव्हज आदी साहित्याचे वाटप करण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत मतदान पार पडले.