शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ६६४ आराेपींचा लातूरच्या पाेलिसांना गुंगारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलीस ठण्यांच्या दप्तरी फरार आराेपींची संख्या माेठी आहे. ...

लातूर शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलीस ठण्यांच्या दप्तरी फरार आराेपींची संख्या माेठी आहे. जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२१ या काळात जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल ८१४ आराेपींना फरार घाेषित करण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी गत पाच वर्षांपासून स्थानिक पाेलीस आणि विशेष पाेलीस पथक प्रयत्नशील आहेत. मात्र, आराेपींकडून या पथकांना चकवा दिला जात आहे. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या आराेपींची क्राइम हिस्ट्री कलेक्ट केली आहे. आता या आराेपींचे सर्च ऑपेरशन सुरू करण्यात आले आहे. गत दाेन महिन्यांत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये २२५ आराेपी फरार झाले हाेते. त्यातील ४८ जणांना अटक करण्यात आली. २०१८ मध्ये २०९ आराेपी फरार हाेते. त्यातील ४४ जणांना अटक झाली. २०१९ मध्ये १६२ आराेपी फरार झाले तर त्यातील ४९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. २०२० मध्ये ११३ अट्टल गुन्हेगार फरार झाले. त्यातील केवळ ८ आराेपींना अटक करण्यात आली. तर ऑगस्ट २०२१ अखेर १०५ गुन्हेगार फरार झाले असून, १ आराेपी हाती लागला आहे.

अटकेसाठी विशेष माेहीम...

पाेलिसांच्या रेकाॅर्डवर फरार असलेल्या अट्टल, खतरनाक गुन्हेगारांच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. सध्याला या आराेपींना अटक करणे हा प्राधान्याचा विषय आहे. त्यासाठी त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या स्तरावर, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. गत दाेन महिन्यांत १४ अट्टल गुन्हेगार पाेलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. ही माेहीम वर्षभर सुरु राहणार आहे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

फरार ओराेपींची आकडेवारी...

वर्ष फरार आराेपी अटक आराेपी

२०१७ २२५ ४८

२०१८ २०९ ४४

२०१९ १६२ ४९

२०२० ११३ ०८

२०२१ १०५ ०१

एकूण ८१४ १५०