शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

लातूर लोकसभेसाठी ५५.३८ टक्के मतदान, एका गावचा बहिष्कार कायम

By हणमंत गायकवाड | Updated: May 7, 2024 19:13 IST

उन्हाचा चटका लक्षात घेता सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान झाले असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३८ मतदान झाले होते. उन्हाचा चटका लक्षात घेता सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक मतदान केंद्र सजविल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली होती. चाकूर तालुक्यातील वडवळ येथील मतदान केंद्राबाहेर वनौषधीचे महत्त्व या विषयावरील स्टॉल मतदारांचे आकर्षण ठरले. दरम्यान, लातूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सुनेगाव सांगवी येथे मतदारांनी बहिष्कार टाकला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नव्हते. बूथ क्रमांक ४४ वर एकूण ४७७ मतदार आहेत. त्यापैकी २५६ पुरुष आणि २२९ महिला मतदार आहेत. प्रशासनाने समजूत काढली. मात्र, मागणी मान्य न झाल्यामुळे मतदारांनी बहिष्कार कायम ठेवला आहे. हा अपवाद वगळता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान झाले. रेणापूर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्र बांबू व बांबूच्या ताट्ट्यांनी सजविले होते. तर सखी, दिव्यांग, युवा मतदान केंद्रांवर वेगळा उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, लातूर शहर ५३.५६, लातूर ग्रामीण ५७.३७, अहमदपूर ५६.२२, उदगीर ५४.४०, निलंगा ५६.१० आणि लोहा मतदासंघात ५४.९५ टक्के मतदान झाले होते. एकूण लातूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५५.३८ टक्के मतदान झाले होते.

सिनेअभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया यांचे बाभळगाव येथे मतदान...अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीयांनी बाभळगाव येथे मतदान केले.

कोणी कोठे मतदान केले...क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी बाभळगाव येथे तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथे मतदान केले. आ. रमेश कराड यांनी रामेश्वर येथे मतदान केले असून, आ. बाबासाहेब पाटील यांनी शिरुर ताजबंद येथे हक्क बजावला. भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर शहरात तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे मतदान केले.

टॅग्स :latur-pcलातूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४