उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुठे दुरंगी, तर कुठे तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील एकमेव तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. एकुर्गा खुर्द येथील ७, डोंगरकोनाळी १ व अन्य ठिकाणच्या अशा एकूण १६ सदस्यांच्या जागा बिनविरोध निघाल्या असल्याची माहिती तहसीलच्या निवडणूक विभागाने दिली.
तालुक्यातील गावनिहाय उमेदवारांची संख्या : एकुर्गा- ९, अतनूर- २६, मेवापूर- १४, गव्हाण- १८, चिंचोली- १३, मरसांगवी- २६, सुल्लाळी- १९, डोंगरगाव- १४, शिवाजीनगर तांडा- १३, घोणसी- ३५, बोरगाव खुर्द- २१, वांजरवाडा- ४४, शेलदरा- १५, वडगाव- १३, येलदरा- १४, कोळनूर- १८, पाटोदा खुर्द- १६, रावणकोळा- २७, हळद वाढवणा- ११, सोनवळा- ३१, डोंगर कोनाळी- १४, लाळी बु.- १७, बेळसांगवी- २१, धामणगाव- १८, कुणकी- १८, विराळ- १४ असे एकूण ५०८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मंगळवारपासून तालुक्यातील गावा- गावांत प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.