शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओटीपी चेक करताना निवृत्त प्राध्यापकाचे एटीम कार्ड बदलले; काही वेळात ४० हजार गायब

By हरी मोकाशे | Updated: September 19, 2022 15:54 IST

मोबाईलमध्ये ओटीपी पाहत असताना बदलले एटीएम कार्ड

उदगीर ( जिल्हा लातूर) : येथील शहर पोलीस स्टेशनच्यासमोर असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका निवृत्त प्राध्यापकाच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून त्या प्राध्यापकाच्या खात्यातून ४० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत उदगीरच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयीतास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उदगीर येथील बिदर रोडवरील होळकर गार्डनच्या परीसरात राहणारे निवृत्त प्राध्यापक महादेव बसवण्णा गंदीगुडे हे १२ सप्टेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचाजवळील एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले व मोबाईल आलेला ओटीपी पाहतेवेळी पाठीमागे थांबलेल्या अज्ञात युवकाने मशीनमधील कार्ड काढून दुसरेच एटीम कार्ड मशीनमध्ये टाकले.

पासवर्ड दाबून सुध्दा रक्कम येत नसल्याने त्यांनी पुन्हा पासवर्ड दाबला. परंतु वारंवार चुकीच्या संदेश म्हणून एटीएमच्या मशीनवर दर्शनी भागावर दाखवत असल्याने ते त्या मशीनमधील असलेले कार्ड घेऊन बाहेर पडले. नंतर काही वेळात त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे मोबाईलवर एसएमएस आला. त्यामुळे ते चौकशी करण्यासाठी बँकेकडे परत फिरले. ते बँकेत येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढून घेतले होते .ही बाब त्यांनी बँकेत जाऊन बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर बँकेने त्यांचे खाते लॉक केले. याबाबत त्यांनी रविवारी उदगीर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी तेलंगणा येथील एका युवकास चौकशीसाठी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :atmएटीएमlaturलातूर