शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटात ३३ हजार नागरिकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक गुरुवारी जळकोट शहर व तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, लसीकरण संदर्भात जनजागृती केली जात आहे. ...

आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक गुरुवारी जळकोट शहर व तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, लसीकरण संदर्भात जनजागृती केली जात आहे. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता राज्यमंत्री संजय बनसोडे व आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी जळकोट तालुक्यात लसीकरण आढावा बैठक घेत लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाची टीम तालुक्यातील ४७ गावात कार्यान्वित झाली आहे. जळकोट तालुक्यात २४ हजार ९६० जणांनी पहिला डोस घेतला असून, ८ हजार २०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण ३३ हजार १६२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय जळकोट पीएससी अंतर्गत लसीकरण झाले आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालय जळकोटचे डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार डॉ. फारुख मनियार, डॉ. भारती, डॉ. भातलवंडे, डॉ. सचिन सिद्धेश्वरे, डॉ. शीतल काळे, श्रीकांत सोपा, डॉ. महादेव डांगे, डॉ. बिरादार, डॉ. तांबोळी आदींसह आरोग्य कर्मचारी लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

लसीकरण जनजागृती मोहिमेवर भर...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकार पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच जळकोट शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभाग, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शहरातील नगरसेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस निरीक्षक लसीकरण जनजागृती मोहिमेसाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाला जळकोट तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.