वीजपुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्या
पालकमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले, वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी आराखडा सादर करावा. यासाठी लागणारा आवश्यक निधी शासन व नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात येईल. रोहित्र दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
रोजगार हमीचा जळगाव पॅटर्न
रोजगार हमी योजनेचा जळगाव पॅटर्न काय आहे, याची माहिती संबंधित यंत्रणेने घ्यावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा. हा पॅटर्न जिल्ह्यात कशा पद्धतीने राबविणे शक्य आहे, याची खात्री करून ग्रामीण भागात बेरोजगारांना काम उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गाची कामे जलदगतीने करावी, रोहित्र तसेच वीजलाईनची दुरुस्ती करावी, पाणीपुरवठ्याच्या योजना सौरऊर्जेवर करण्याचे नियोजन करावे, पाणंद रस्त्यासाठी तसेच ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.