सूत्रांनी सांगितले, औसा तालुक्यातील गाेद्री येथील एका पाॅवर हाउसनजीक बेकायदेशीरपणे मळीची वाहतूक हाेत असल्याची माहती मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवार, ४ फेब्रुवारी राेजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी मळीची वाहतूक करताना एम.एच.१३ सी.यू. ५८०३ आणि एम.एच. २३ सी.यू. १६१८ दाेन टेम्पाे आढळून आले. दरम्यान, यावेळी मशाक दस्तगीर नदाफ आणि अल्ताफ नदाफ या दाेघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविराेधात महारष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराचा राज्य उत्पादन शुल्क विभाागाच्या पथकाकडून शाेध घेतला जात आहे. यावेळी २०० लीटर क्षमतेचे ६५ बॅरलमध्ये १३ हजार लीटर मळी आणि इतर मुद्देमाल असा एकूण २८ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक आर. जी. राठाेड, दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, निलेश गुणाले, हणमंत मुंडे, ए.एम. फडणीस यांच्या पथकाने केली.