कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी राज्य शासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, दारुविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. शहरातील एका ठिकाणी सतीश जाधव, सुभाष माने व दोन महिला आपल्या घरात विनापरवाना जादा दराने दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तहसीलदार गणेश जाधव व पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी संयुक्तरित्या सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी दारूच्या ४७१ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत २४ हजार ४९२ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रणिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ. नागटिळक हे करीत आहेत.
२५ हजारांची दारू जप्त, दोन आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST