शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

२५ अर्ज विकले पण एकही अर्ज दाखल नाही

By admin | Updated: March 27, 2016 00:14 IST

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़

लातूर :एक तर दुष्काळ, पुन्हा निवडून आलो तरी कारभार करण्यासाठी केवळ आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी़ खर्च लाखांवर अन् मिळकत़़़ नसल्याने महापालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीत फारसा उत्साह नाही़ इच्छुकांनी अर्ज विकत घेतले पण अद्याप एकही अर्ज निवडणूक विभागाकडे आला नाही़ कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दुष्काळाचा विषय पेरण्यात आला़ त्यातच पुन्हा सत्ताधारी काँग्रेसने माघार घेतल्याने निवडणुकीचा रंग फिकट झाला आहे़लातूर शहर दुष्काळाच्या दुष्ट चक्रात सापडलेले असताना पाण्याचा विषय गंभीर बनला आहे़ सर्वत्र एकच मागणी ती म्हणजे पाण्याचीच़ कचऱ्याचाही प्रश्न गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे़ रखरखत्या उन्हात घागरभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांनाही पोटनिवडणुकीविषयी आस्था उरली नाही़ काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे़ मागील दीड वर्षांपासून त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा होती़ त्यावेळी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्याही अधिक होती़ आता नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे़ त्यामुळे खर्च करायचा कसा ? त्यात पुन्हा दुष्काऴ केलेला खर्चही निघणे शक्य नसल्याने इच्छुकांची संख्या घटली आहे़ काँगे्रसने माघार घेतल्याने पोटनिवडणुकीची रंगत गेली असली तर शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू आहे़ शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी या दोघांनीही पोटनिवडणूक लढायचीच असा पण केला आहे़ २९ मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात आणि त्यातून कितीजण माघार घेतात, यावर निवडणुकीच्या रंगाचा ढंग समोर येणार आहे़ राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावे म्हणाले, आम्ही निवडणूक लढणार आहोत, दहा इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत़