शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार मतदार; ६२ केंद्रावर होणार मतदान

By संदीप शिंदे | Updated: April 26, 2023 17:56 IST

लातूर, औसा, उदगीर, चाकूरसाठी २८ तर उर्वरित सहा समित्यांसाठी ३० रोजी मतदान

लातूर : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी निवडणुक होत असून, उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने मतदान आणि मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार २४९ मतदार आपला हक्क बजावणार असून, मतदानासाठी ६२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील लातूर, देवणी, जळकोट, निलंगा, औसा, रेणापूर, औराद शहाजानी, जळकोट, चाकूर आणि अहमदपूर बाजार समित्यांसाठी निवडणुक होत आहे. यामध्ये लातूर, औसा, चाकूर आणि उदगीर बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उर्वरित सहा बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने बाजार समित्यांसाठी निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, ६२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये २२ हजार २४९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. 

दरम्यान, विविध राजकीय पक्षांची निवडणुकीमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पॅनलमधील उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल व तोलारी यांच्या बैठका घेण्यात येत आहे. बाजार समितीत सत्ता आल्यास काय करणार याबाबत जाहीरनामाही देण्यात येत आहे. मात्र, निकालानंतरच मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीनिहाय असे आहेत मतदार...लातूर बाजार समितीमध्ये ५९८३, देवणी ९४७, अहमदपूर २१७५, औसा २७१९, चाकूर १४६९, जळकोट १०८९, रेणापूर १४१९, औराद शहाजानी १२७६, निलंगा १७३७ तर उदगीर बाजार समितीसाठी ३ हजार ४३५ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. औसा, लातूर, उदगीर, चाकूर या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवार, २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, औराद शहाजानी, निलंगा या सहा बाजार समित्यांसाठी रविवार ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.

सहकारी संस्था मतदार संघात सर्वाधिक मतदार...दहा बाजार समित्यांसाठी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी आणि हमाल व तोलारी मतदारसंघ आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक ८ हजार ८४ मतदार आहेत. त्यापाठोपाठ ग्रामपंचायत मतदारसंघात ६ हजार ८८७, व्यापारी मतदारसंघ ५ हजार २७५, हमाल व तोलारी मतदारसंघात ३ हजार ३ मतदार आहेत. या मतदारांसाठी एकाच ठिकाणी मतदार करता यावे, यासाठी ६२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील बहूतांश मतदारसंघ हे शाळेच्या ठिकाणी आहेत. २८ आणि ३० एप्रिल असे दोन टप्प्यात मतदान होणार असून, मतादनाच्या दिवशीच दुपारी ४ वाजेनंतर मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :laturलातूरElectionनिवडणूक