लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असून, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने लातूर शहर आणि बोरगाव काळे येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५२ जणांनी रक्तदान केले.
लातूर शहरात आयोजित शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, अभिमन्यू जगदाळे, ॲड. वैशाली लोंढे, प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यशस्वीतेसाठी संयोजक राहुल जाधव, प्रमोद निपाणीकर, विशाल काळे, गंगाधर पवार, उमेश देशमुख, महेश भोसले, अण्णा सोमवंशी आदींसह वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान बोरगाव काळे येथील शिबिराला मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ढोणे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
कॅप्शन :
महारक्तदान शिबिर...
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने लातुरात रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, ॲड. वैशाली यादव, प्रशांत पाटील, राहुल जाधव, प्रमोद निपाणीकर, विशाल काळे आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.