शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

By आशपाक पठाण | Updated: September 12, 2023 18:23 IST

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

उदगीर (लातूर) : तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. खिचडी खाल्ल्यावर काही वेळात विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तत्काळ त्या विद्यार्थ्यांना उदगीर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

खिचडी खाल्ल्यावर त्रास झालेल्या १५ पैकी ११ जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर ४ जण दक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सामान्य रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय महिंद्रकर यांनी सांगितले. तोंडारच्या शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात तांदूळ व हरभरा याचा वापर करून बनविण्यात आलेली खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही जणांनी खिचडी शाळेत खाल्ली तर काहीजण घरी घेऊन गेले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना मळमळी व उलटीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी खिचडीमध्ये आळ्या असल्याच्या व तांदळाला जाळ्या आणि हरभरे हे किडके वापरल्याचा आरोप केला आहे. निकृष्ट धान्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पोटदुखीमुळे विद्यार्थी त्रस्त...रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता, त्यामुळे ते विद्यार्थी रडत होते. यावेळी शाळेतील शिक्षिकाही रूग्णालयात उपस्थित होत्या. शाळेच्या कामानिमित्त उदगीरला गेलेले प्रभारी मुख्याध्यापक आर.बी. फड घटनेची माहिती मिळताच शाळेत हजर झाले.

सर्वांची प्रकृती स्थिर : डॉ. महिंद्रकररूग्णालयाच्या दक्षता विभागात अनिकेत जाधव (वय ६), सृष्टी मालोदे (वय ६), रंगनाथ कबाडे (वय १०) आरती गायकवाड (वय ८) यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच रिया गायकवाड (८), पृथ्वीराज चव्हाण (१२), अभिषेक तेलंगे (६), जुनेद शेख (११ ), यश जाधव (१०), नागनाथ गायकवाड (१०), गुरु दाजी (७ ) अनुजा स्वामी (९), अंजली राठोड (९) विजय राठोड ( ७) विजया राठोड (६) यांच्यावर उपचार करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, कुणालाही कोणताही धोका नाही असे सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.अजय महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर