औसा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव...
सिंचन विहिरीसाठी औसा तालुक्यातून सर्वाधिक ३५० प्रस्ताव दाखल झालेले आहेत. त्यापैकी २७८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच उदगीर तालुक्यातील २०२ पैकी १७१, रेणापूर १६७ पैकी ११७, लातूर ७० पैकी ६०, चाकूर ११५ पैकी १०१ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही होणार असल्याचे रोहयो विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रलंबित प्रस्तावांसाठी पाठपुरावा...
कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी काही प्रस्ताव अपूर्ण आहेत. नवीन आदेशानुसार सिंचन विहिरींच्या मंजुरीचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जे प्रस्ताव अपूर्ण आहेत, ते संबंधित पंचायत समितीकडे पाठविले जाणार आहेत. ११५० पैकी ११७३ प्रस्तावांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. - महेंद्र कुलकर्णी, गटविकास अधिकारी, नरेगा, जि. प. लातूर.
विहिरीसाठी एकूण आलेले प्रस्ताव - १५००
प्रशासकीय मंजुरी मिळालेले प्रस्ताव - ११७३
तालुकानिहाय प्रस्ताव...
अहमदपूर - ९०
औसा - ३५०
चाकूर - ११५
देवणी - १११
जळकोट - ११४
लातूर - ७०
निलंगा - २०९
रेणापूर - १६७
शिरुर अं. - ७२
उदगीर - २०२