शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

लातूर जिल्ह्यात तीन महिन्यांत ११२ व्यक्तींना सर्पदंश; तत्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

By हणमंत गायकवाड | Updated: July 28, 2023 18:45 IST

सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे.

लातूर : जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये ५५४ व्यक्तींना सर्पदंश झाला असून या सर्वच व्यक्तींना रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार भेटल्याने अनर्थ टळला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात सर्वाधिक ११२ जणांना सर्पदंश झाला आहे. विशेष करून या तीन महिन्यांमध्येच साप बाहेर येण्याचे प्रमाण अधिकचे असते. त्यामुळेच माणसांच्या संपर्कात येऊन ते चावण्याच्या घटना घडतात.

सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी मुबलक साठा उपलब्ध केला आहे. विषारी साप चावल्यानंतर कुठल्या औषध लागते. त्या सर्व औषधांचा साठा रुग्णालयाने उपलब्ध करून ठेवला आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जून, जुलै महिन्यामध्ये तसेच खरीप पीक काढणीच्या वेळी सर्पदंश होण्याच्या घटना वाढत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने औषधांची वाढीव मागणी केली आहे, जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला, त्याला धीर देऊन तत्काळ दवाखाना गाठायला हवा. गैरसमज जास्त असल्याने भीतीमुळेच धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ उपचार घ्यावे.

सर्पदंश झाल्यानंतर काय करायला हवे... मोकळा स्वच्छ जागेत हलवावे.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा, पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे,विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे, विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे. आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे, दर १५ ते २० मिनिटांनंतर १५  सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते,दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे. तत्काळ मदत करता येईल, दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा ॲलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

सुरक्षित जागेच्या शोधात असतात साप... पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता.या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. घाबरून न जाता समोरे जायाला हवे, सर्प मित्रांनी सांगितले. प्रजनन काळ आणि पाऊस एकदाच येत असल्याने बाहेर साप पडतात. यावेळी सर्पदंश होऊ शकतो.

टॅग्स :snakeसापlaturलातूर