शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’तील तक्रारींची १५ दिवसांत निर्गत

By admin | Updated: April 20, 2017 01:27 IST

शौमिका महाडिक : सर्व विभागांचा घेतला आढावा; स्वतंत्र तक्रारवहीचे नियोजन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेबाबतच्या सर्व तक्रारींची १५ दिवसांत निर्गत लावली जाईल. त्यासाठी स्वतंत्र तक्रार वही घालून त्या तक्रारी सोडविण्यासाठी जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सलग चार दिवस महाडिक यांनी सर्वच विभागांच्या आढावा बैठका घेतल्या असून, यामध्ये अतिशय तपशीलवार सादरीकरण पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बाराही तालुक्यांतून लांबून येणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली गेली पाहिजे. त्यासाठी अधिकारी जागेवर नसतील तर किमान त्या विभागाच्या अन्य कुणीतरी त्यांच्या कामाबाबत चर्चा केली पाहिजे. कुणालाही वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सर्वच विभागांच्या एकूण १२२ योजनांबाबत या बैठकांमध्ये सादरीकरण करण्यात आले. अतिशय मूलभूत असा हा आढावा घेण्यात आला. महत्त्वाची कोणतीही कामे प्रलंबित आहेत ती १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचतो का याचीही खात्री करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाबाबत सातत्याने काही तक्रारी असतात. शासनाचे आदेशही सातत्याने बदलत असतात. यामध्ये अधिकाऱ्यांनाही मर्यादा पडतात. परंतु, स्वतंत्र शिबिरे घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. कलाकारांच्या मानधनाचा प्रश्नही निकालात काढण्यात येणार आहे. प्रशासनानेही कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी अपेक्षा आहे. पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही लवकरच होतील. शुक्रवारी पंचगंगा प्रदूषण आणि जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी विशेष बैठक आयोजित केली आहे. सोमवारी आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबावे, अशी येथील प्रथा आहे. ती गांभीर्याने पाळण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. जरी अधिकारी फिरतीला, बैठकीला बाहेर गेले असतील तरी त्या विभागाच्या इतरांनी आपल्या कामासाठी येणाऱ्यांना घालवून देण्यापेक्षा त्यांचे काम काय आहे याची चौकशी करून त्याला माहिती दिली पाहिजे.‘आजच्या निवडी सर्वसंमतीने होतील’आज जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडी आहेत. त्यामध्ये सर्वसमावेशक धोरण ठेवल्याने या निवडी सर्वसंमतीने होतील. यात काही फार अडचण येणार नाही, असे शौमिका महाडिक यांनी सांगितले.