शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला...

By admin | Updated: October 6, 2015 00:41 IST

बारा हजार महिलांचा सहभाग: भागीरथी महिला संस्थेचे आयोजन

कोल्हापूर : पारंपरिक वेशभूषेमुळे खुलून दिसणारा मराठमोळ्या सौंदर्याचा थाट, पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर, प्रोत्साहनासाठी हजारो टाळ्यांचा गजर अशा वातावरणात हजारो महिलांचा झिम्मा-फुगडीचा खेळ रंगला. निमित्त होते धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे. मुस्कान लॉनवर आमदार संध्यादेवी कुपेकर, मंगलताई महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या शौमिका महाडिक, वैशाली क्षीरसागर, संगीता शेट्टी, मौसमी आवाडे, अकलूजच्या सविता वोरा, पंचायत समितीच्या सदस्या अरुणिमा माने आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महाडिक यांनी युवतींच्या सक्षमीकरणासाठी भागीरथी युवती मंच स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच कोल्हापूर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संस्थेच्या वतीने कापडी बॅगा बनवून त्या वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महिलांनी जुन्या साड्या, कपडे दान करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सकाळी आठ वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत नटूनथटून, कोल्हापुरी साज-नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये दंग झाल्या. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ‘झी मराठी’वरील ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमधील इंद्रनील म्हणजे चिन्मय उदगीरकर आणि स्वानंदी म्हणजे ऋतुजा बागवे या जोडीने स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावून, महिलांचा उत्साह द्विगुणित केला. या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसे होती. सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेक वाचवा, झाडे लावा, प्रदूषण टाळा असा सामाजिक संदेश दिला. ‘चॅनल बी’च्यावतीने स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्री उशिरा बक्षीस वितरण सोहळा झाला. ( प्रतिनिधी)