शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील शिपायाची आत्महत्या

By admin | Updated: January 6, 2015 01:07 IST

झाडाला घेतला गळफास : बिल्डरने फ्लॅट नावावर न केल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा

कसबा बावडा : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिपायाने आज, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कात्यायनी परिसरातील आपल्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रामचंद्र केंबळे (वय ५८, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा) असे त्यांचे नाव आहे. बिल्डरने पैसे भागवूनही फ्लॅट नावावर न केल्याच्या नैराश्यातून केंबळे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी केंबळे हे माजी सैनिक असून, त्यांची शेती कळंबा-कात्यायनी परिसरात आहे. सध्या ते जिल्हा परिषदेमध्ये शिपाई पदावर नोकरीस होते. त्यांच्या शेतामध्ये सकाळपासून गवतकापणी सुरू आहे. ते पाहण्यासाठी जातो असे सांगून घरातून मोटारसायकलवरून ते निघून गेले. काही वेळाने त्यांनी आपल्या मुलग्याला गाडीची किल्ली हरविली असल्याचे सांगून ती घेऊन येण्यास सांगितले. किल्ली घेऊन मुलगा शेतामध्ये आला असता वडिलांनी चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या (पान १० वर)नेत्रदानाचा संकल्पशिवाजी केंबळे मनमिळावू स्वभावाचे होते. जिल्हा परिषदेमध्येही त्यांचे वर्तन साधे होते. त्यामुळे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या परिचयाचे होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यानंतर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी केंबळे यांच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये बिल्डरच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही अथवा त्यांच्या नातेवाइकांनी तक्रार दिलेली नाही. - दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे