शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळा होणार ‘डिजिटल’

By admin | Updated: April 7, 2016 00:25 IST

आजरा तालुका : ९७ शाळांत डिजिटल वर्ग; पुढचा टप्प्यात ‘मोबाईल डिजिटल’ ही संकल्पना

परंडा : एका हॉटेल, लॉजिंगचा नवीन परवाना व एका हॉटेलच्या परवाना नुतनीकरणाचे काम तहसीलदारांकडून करून घेतो, असे म्हणत तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेतल्यानंतर परंडा तहसीलचे अव्वल कारकून अमोल सखाराम रांजणकर यांच्याविरुद्ध ‘एसीबी’ने धडक कारवाई केली़ ही कारवाई बुधवारी दुपारी परंडा तहसीलच्या आवारात करण्यात आली असून, या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील लोहारा शिवारातील गट नंबर २०५ मध्ये तक्रारदाराचे हॉटेल रेस्टॉरंट, फॅमिली गार्डन, परमिट रूम व लॉजिंग सुरू केले आहे़ याच्या परवाना नुतनीकरणासाठी तसेच परंडा शहराच्या शिवारातील गट नंबर २१२ मध्ये नव्याने सुरू केलेल्या हॉटेल व लॉजिंगच्या नवीन परवान्यासाठी तक्रारदाराने परंडा तहसील कार्यालयात फिस भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह रितसर अर्ज केला होता़ मात्र परवान्याचे काम तहसीलदारांमार्फत करून घेण्याच्या कामासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अमोल सखाराम रांजणकर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली़ पैशाची मागणी होताच तक्रारदाराने उस्मानाबादेतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती़ तक्रारदाराची तक्रार दाखल होताच उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी एसीबीचे अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी परंडा तहसीलच्या आवारात सापळा रचला़ तक्रारदाराच्या कामासाठी अव्वल कारकून अमोल रांजणकर यांनी १० हजार रुपयांची मागणी करून ते स्विकारल्यानंतर एसीबीने कारवाई केली़ या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रांजणकर यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर) मागील वर्षात लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने तब्बल ४१ जणाविरुद्ध सापळे रचून कारवाई केली होती़ तर मागील वर्षाप्रमाणेच चालू वर्षातही लाचखोरांविरूध्द एसीबीने धडक कारवाईसत्र हाती घेतले आहे़ चालू वर्षात आलेल्या १२ तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली आहे़ यात शिक्षण, महसूलसह पोलीस विभागातील लाचखोरीचा पर्दाफाशही एसीबीने केला आहे़ कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी होत असेल तर एसीबीच्या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे़