शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर हद्दवाढीला जिल्हा परिषदेचा विरोध

By admin | Updated: June 18, 2015 01:15 IST

सभेत ठराव मंजूर : महापालिका सुविधा देऊ शकणार नसल्याचे कारण

कोल्हापूर : हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या २० गावांत महानगरपालिका सुविधा देऊ शकणार नाही, असे सांगून या हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला. अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. सदस्य बाबासाहेब माळी यांनी हद्दवाढीला विरोधाचा विषय मांडला. ते म्हणाले, महानगरपालिका प्रशासन हद्दीतील सर्व भागांतील रस्ते, गटर्स, पाणी, वीज देण्यात अपयशी ठरली आहे. महानगरपालिकेच्या सभेत नुकतेच हद्दवाढीच्या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. हद्दवाढ झाल्यास २० गावांचा समावेश शहरात होणार आहे. कराच्या रूपाने २० गावांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे हद्दवाढीला विरोधाचा ठराव करावा. ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवावा. ठरावाला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे त्याला मंजुरी देण्यात आली.हिंदुराव चौगले म्हणाले, काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन टाकून पाणी योजना राबविली जात आहे. कामास विरोध नाही. मात्र, पाईपलाईन टाकताना काही शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. याशिवाय राधानगरी पंचायत समिती, ज्या गावांतील हद्दीत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे, त्या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांना विश्वासात घ्यावे. उपाध्यक्ष खोत म्हणाले, थेट पाईपलाईन खासगी शेतकऱ्यांच्या जमिनीतून अधिक अंतर जाणार नाही. शासकीय जमिनीतून येणार आहे. खासगी शेतजमिनीत आल्यास नुकसानभरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी करूया. दुधाळी शूटिंग रेंजसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळाला आहे. त्याच धर्तीवर शाहू क्रीडा प्रशालामध्येही शूटिंग रेंजसाठी निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी सदस्य अरुण इंगवले यांनी केले. (प्रतिनिधी)अध्यक्षांना बँकेत स्वीकृत संचालक म्हणून घ्या..जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या ठेवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना बँकेत ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून घेण्याचा विषय चर्चेत आला. सहकारात ९७ वी घटना दुरूस्ती केल्याने अध्यक्षांना स्वीकृत म्हणून घेता येत नाही. त्यामुळे अध्यक्षांना स्वीकृत संचालक म्हणून घ्या, असा ठराव करणे चुकीचे होईल, असे मत सदस्य ए. वाय. पाटील यांनी मांडला. अर्जुन आबिटकर, उपाध्यक्ष खोत, इंगवले यांनी शासनाकडे पाठवून तरी द्या, असा आग्रह धरला.आता ३०२ कलमाचाच वापर..आम्ही सदस्यांनी एखादे काम सांगितल्यानंतर शासन आदेशातील कलमे अधिकारी दाखवितात. मात्र, शासन आदेश डावलून रूकडी येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी शासनाचे नियम सोडून जिल्हा परिषदेची जागा देण्याचा विषय येतोे कसा, असा प्रश्न परशराम तावरे यांनी उपस्थित केला. यापुढे मी आता ३०२ (खून करणे) या कलमाचा वापर करतो, असा गंभीर इशाराही प्रशासनाला दिला.