शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची कर्जमर्यादा ३५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची कर्जमर्यादा २५ लाखांवरून ३५ लाख रुपये करण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची कर्जमर्यादा २५ लाखांवरून ३५ लाख रुपये करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ५४ वी वर्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्था कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजीव परीट होते.

अध्यक्ष परीट म्हणाले, संस्थेचे ३३३२ सभासद असून, १०३ कोटी ४६ लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेने अहवाल सालात १०६ कोटी ४ लाखांची कर्जे वाटप केली असून, २५ कोटी ८९ लाखांची गुंतवणूक केली आहे. संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने तब्बल ३ कोटी १८ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १२.५० टक्के लाभांश, ११ टक्के कायम ठेवीवर व्याज, तर १० टक्के वर्गणी ठेवीवर व्याज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संस्थेच्या दुरुस्ती खर्चाबाबत सचिन जाधव यांनी विचारले. यावर केवळ हा खर्च दुरुस्तीवर नाहीतर सुरक्षा रक्षकांसह पाच शिपायांचा पगारही यामध्ये असल्याचे अध्यक्ष परीट यांनी सांगितले. कर्जाच्या वसुलीचे धनादेश महिन्याच्या २० ते २५ तारखेनंतर जमा होतात, त्याऐवजी १ ते ५ तारखेपर्यंत जमा व्हावेत, अशी मागणी संजय शिंदे यांनी केली. सेवेतून कमी केलेल्या अकरा कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे काय? अशी विचारणा उत्तम वावरे यांनी केली. यावर याबाबत संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून, वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात प्रकरणे असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी सांगितले.

व्यवस्थाप व्ही. एन. बोरगे यांनी अहवाल वाचन केले. रवींद्र घस्ते यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी आभार मानले.

‘एम. आर’सह संचालकांचे अभिनंदन

रसातळाला गेलेली संस्था एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कोट्यवधीच्या नफ्यात आणली. याबद्दल बहुतांशी सभासदांनी अभिनंदनाचे ठराव मांडले. त्याचबरोबर संस्थेची निवडणूक बिनविरोध करावी, असा आग्रह धरला.

फोटो ओळी : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्था कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष राजीव परीट यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-२१०३२०२१-कोल-झेडपी) (छाया- नसीर अत्तार)