शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झक्काझक्की - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

कधी रात्री उशिरा कणिकाला डोळा लागायचा. सुकांत हात-पाय नाचवत पाळण्यात खोलीतील रंगीत दिव्यांकडे पाहून आनंदाने हात-पाय जोराने हलवायचा. पायांतील ...

कधी रात्री उशिरा कणिकाला डोळा लागायचा. सुकांत हात-पाय नाचवत पाळण्यात खोलीतील रंगीत दिव्यांकडे पाहून आनंदाने हात-पाय जोराने हलवायचा. पायांतील घागऱ्या-वाळे, मनगटांचे घुंगरू वाजायचे. अतिशय सुंदर, गोड स्वर झंकारायचे; पण अरसिक, केवलला त्या आवाजाची कटकट वाटायची. तो लगेच कणिकाला गदागदा हलवून उठवायचा, “हे बये, झोपलीस काय? ऊठ, त्याला मांडीवर घे. थोपट आणि झोपव एकदाचा. काय कार्टं तरी द्वाड आहे. दिवसा ढोणारतो आणि आख्ख्खी रात्र जागून झोप हराम करतो.’

त्याच्या ह्या असल्या त्रासिकपणाचा कणिकाला मनस्वी संताप यायचा. त्याला शांत करण्यासाठी, झोपण्यासाठी ती एक सुरेख अंगाईगीत म्हणायची -

नक्षत्राचे दीप उजळले, झाल्या धुंद दिशा दाही

नीज रे बाळा, नीज लडिवाळा, नीज लवलाही

स्वप्नपरी ती डोळ्यावरती

अमृत झारी हळूच शिंपिते

अंगाईची ओळ, अंगुली

नयन पाकळ्या तुझ्या झाकिते

गंध उधळीतसे रजनीगंधा, फुलून जाई-जुई.’

बाळा नीज लवलाही...

फुले गुंफुनी रातराणीची

विणली मी, ही मच्छरदाणी

कुंद कळ्याची शेज मखमली

आता येऊ दे निद्रा राणी

ही मायेची शाल घालिते, छकुल्या झोपी जाई।।

बालके आणि संगीताचे सूर, गीताची गोडी ह्यांचा फार जवळचा संबंध असला पाहिजे. त्यामुळेच अंगाईगीते म्हटली जातात. बाळाच्या डोक्यावर ते स्वर हात फिरवून त्याच्या पापण्या मिटतात आणि बाळ शांत, सुखाने झोपी जाते. हा स्वर माधुर्य आणि झोप ह्यांचा अनवट संगम काय असतो, हे कळत नाही; पण संगीतोपचार पद्धतीत मोठ्या माणसांनाही सुंदर गाणी ऐकली की, मनावरचा ताण हलका होऊन शांत झोप लागते. शब्द कळले नाही तर गाण्याने, त्या चालीने बाळे कशी ते संगीत समजतात, हा आश्चर्याचा विषय आहे.

रात्री उशिरा झोपण्याने कणिका खूप उशिरा उठायची. मग तिला उठवून केवल डबा करून द्यायला लावायचा. एखाद्या सकाळी ती उठवलं नसेल तर झोपून राहायची. झालं, केवलच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा, बेफिकीरपणे.

कधी-कधी कणिकालाही त्याच्या ह्या बेदरकारीचा राग येत असे.

‘तुमचापण मुलगा आहे ना सुकांत? तुम्हाला काहीच कसं प्रेम वाटत नाही त्याच्याबद्दल? तुमचीपण जबाबदारी आहे त्याला सांभाळायची. मी आई आहे तसे तुम्ही त्याचे वडील आहात.’

‘हो, पण मला वेळच मिळत नाही. खूप काम असतं. सारा दिवस थकायला होतं. रात्री झोप खायला उठते. त्याला एकदा बालरोगतज्ज्ञांकडे दाखवून आणू. हा रात्रीचं का गोंधळ घालतो?’

‘अहो, ते अजाण बालक आहे. त्याला जेव्हा झोप येईल; तेव्हा तो झाेपणार? मुलं वाढू लागतात तशा त्यांच्या आहात, निद्रा वेगवेगळ्या वेळा बदलतात. त्यात डाॅक्टर काय सांगणार.’

‘मला जास्त अक्कल शिकवू नकोस. मी काय लहान बाळं पाह्यलीच नाहीत का?’

‘माझ्याइतकीच तुमचीपण जबाबदारी आहे. माझं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हीही सुकांतकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही जर त्याला घेतलं नाही, त्याला खेळवलं, कुरवाळलं नाही, तर तो तुम्हाला ओळखणारच नाही. मुलांना आई-बाप बरोबर समजतात, हाताच्या उबेने, मृदुल स्पर्शाने.’

‘पुरे झालं तुझं लेक्चर. दे आता डबा. निघतो मी.’

कणिका मनात म्हणाली, ‘पालथ्या घड्यावर पाणी. हे असे हेकेखोर वागत राहिले तर मला घर सोडावं लागेल, ह्या असल्या निर्दयी माणसामुळे.’

सहा महिन्यांची रजा संपली. आता मोठा प्रश्न होता, सुकांतला सांभाळण्याचा. सासूबाईंनी त्याला सांभाळायची तयारी दाखविली. ‘तू हजर हो कामावर, मी सांभाळीन सुकांतला.’

रात्री कणिकाने तोच विषय केवलशी बोलताना काढला.

‘काही नाही जायचं कामावर. आईला झेपणार आहे का सुकांतचं संगोपन? काही गरज नाही तुझ्या नोकरीची. घरी बस. तो समजूतदारपणाने वागू लागला की जायचंस तू.’

ह्यावरून दोघांची झक्काझक्की रात्रभर चालली.

एकदा सुकांत, साधारण एक ते दीड वर्षांचा झाला. त्यावेळी बाटलीने दूध प्यायला लागला. त्याला भूक लागली. तो रडू लागला. कणिका साखर घालून दूध गरम करायला गेली. तेवढंच कारण केवलला मिळालं. त्याने लगेच आरडाओरडा सुरू केला,

‘अगं बये लवकर आण दूध. सुकांतचा घसा कोरडा पडू लागलाय. तुला मुलाच्या भुकेचा अंदाज कसा येत नाही? तुम्हाला कामं नकोत. त्या टी.व्ही. सीरिअलमध्ये सगळा जीव गुंतलेला असतो. ना नवऱ्याची पर्वा, ना मुलाची काळजी. आण दूध लवकर.’