शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजचा ‘एफआरपी’साठी फायदा शून्य-हसन मुश्रीफ यांची टीका : ही तर नुसती आकड्यांचीच धूळफेक; पुढील हंगामात वित्त पुरवठा अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:54 IST

केंद्र शासनाने बुधवारी साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देण्यासाठी काहीच फायदा होणार नाही.

कोल्हापूर : केंद्र शासनाने बुधवारी साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सात हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देण्यासाठी काहीच फायदा होणार नाही. इथेनॉलसाठी जाहीर केलेले ५,८०० कोटी रुपये म्हणजे तरी निव्वळ धूळफेक असल्याची टीका कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत व ही रक्कम ९० दिवस खात्यावर राहिली तर ते खाते ‘एनपीए’मध्ये जाते व तसे झाल्यास पुढील हंगामात बँकांना कारखान्यांना वित्तपुरवठाच करता येणार नाही, अशी भीतीही मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

साखर विक्रीचा किमान दर २,९०० रुपये क्विंटल निश्चित करण्याचा निर्णय मात्र दिलासा देणारा आहे. त्यामुळे यापुढे होणारे नुकसान थांबले. राज्य बँकेचे मूल्यांकनही वाढेल; परंतु माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही रक्कम किमान ३२०० रुपये करावी, अशी मागणी केली होती. त्यातही केंद्राने ३०० रुपये कमी केले आहेत. ही रक्कम वाढवून द्यावी यासाठी पवार, साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ते म्हणाले, इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण असो की नवीन उभारणी, त्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या एवढ्या परवानग्या घ्याव्या लागतात की, त्यासाठी किमान दोन वर्षे जातात.‘ऋतुराज’च्या भाजप उमेदवारीबाबत खुलासा कराकोल्हापूर : पालकमंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे जर ‘कोल्हापूर उत्तर’मधून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून ऋतुराज संजय पाटील यांचे नाव जाहीरपणे घेत असतील तर त्यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भूमिका जाहीर करावी व लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मुश्रीफ म्हणाले, ‘मला चंद्रकांतदादांचे राजकारणात काय चाललय हेच समजत नाही. भाजप स्वबळावर लढणार म्हणून त्यांनी जिल्ह्यांतील इतक्या नेत्यांचे इनकमिंग करून ठेवले आहे की त्यांची वही आता भरली आहे. तोपर्यंत त्यांनीच परवा भाजप-शिवसेनेसोबत युती करण्यासाठी अगतिक असल्याचे दोनवेळा जाहीर केले. त्यामुळे ही युती झालीच तर इनकमिंग करून ठेवलेल्या नेत्यांचे मंत्री पाटील काय करणार आहेत..? किमान त्यांना तरी तुम्ही दिल्या घरी सुखी रहा, असा सल्ला द्यावा. युती झाल्यास शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना तरी उमेदवारी द्यावीच लागेल. मग कोल्हापूर ‘उत्तर’मधून राजेश क्षीरसागर यांना थांबवून मंत्री पाटील हे ऋतुराज पाटील किंवा अन्य कोणाला उमेदवारी देणार आहेत का..? तसे होणार नसेल तर मग रोज एका नेत्याचे नाव जाहीर करून तुम्ही त्यांचे राजकीय भवितव्याचे तरी वाटोळे करू नका. ’इंद्राचा ऐरावत लागेल..पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहरासाठी ५०० कोटींचा निधी आणून दाखवा, मी तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले होते. त्यावर मंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन व सर्व खात्यांकडून आलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली व हत्तीवरून मिरवणूक काढा, असा सल्ला स्वत: मंत्री पाटील व आमदार सुरेश हाळवणकर हे प्रत्येक कार्यक्रमात देत आहेत.

मंत्री पाटील यांनी लावलेला हिशेब जर मी व सतेज पाटील यांच्या काळात आणलेल्या निधीसाठी लावायचा झाल्यास पाटील व हाळवणकर यांना आमच्या दोघांची मिरवणूक काढण्यासाठी इंद्राचा ऐरावत आणावा लागेल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

काँग्रेस आघाडीच्या काळात आम्ही दोघांनी वर्षाला दीड हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. भाजपच्या काळात वर्षाला हजार कोटींचा निधी आला, असे मुश्रीफ म्हणाले.