शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बॅलन्सला बँकांकडून ठेंगा

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

खातेदारांची लूट : बचत खात्यात रक्कम नसेल तर सर्व्हिस चार्जेस

प्रकाश पाटील -- कोपार्डे --शहराबरोबरच गावागावांत आर्थिक विकासाची चक्रे गतिमान व्हावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाव तिथे बँकेची घोषणा केली होती. प्रत्येक नागरिक बँकेशी जोडला जावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांना झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडून देण्याचे धोरण राबविले.बँकांनी प्रत्येक खात्यात ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत किमान शिल्लक असावी, अन्यथा खाते बंद केले जाईल, असे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खातेदारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशातील काळा पैसा बाहेर निघावा, विविध योजनेतील अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा व्हावे, यातूनच प्रत्येक गाव बँकिंग व्यवहाराने जोडले जावे म्हणून सर्व बँकांनी प्रत्येक नागरिकांचे झिरो बॅलन्सवर खाते उघडावे, असे धोरण जाहीर केले. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे बचत खाते उघडण्यात आले आहे.मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँकांसह नागरी सहकारी बँकांतूनही प्रत्येक खातेदाराच्या नावावर किमान ५०० ते १५०० रुपये शिल्लक असायलाच हवेत, अन्यथा असे खाते एक तर बंद केले जाईल अथवा अशा खात्यावर असणाऱ्या शिल्लक रकमेतून सर्व्हिस चार्जेस वसूल केले जाईल, असे संदेश पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात असे सेवा कर कपात करण्यासही सुरुवात झाली आहे. हे सेवा कर १५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत आहेत. यामुळे सेवा कराच्या नावाखाली खातेदारांची आर्थिक लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया मिळत आहेत. ग्रामीण भागात दारिद्र्यरेषे-खालील भूमिहीन शेतमजुरांनी शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडली आहेत. दररोजचा रोजगारच एवढा तुटपुंजा आहे की, किमान बँक बॅलन्सची रक्कम भरणे या कुटुंबांसाठी अग्निदिव्यच आहे. त्यामुळे त्यांची बँक खाती बंद होण्याची शक्यता असून, अनुदानाचा लाभ कसा घ्यावयाचा, असे प्रश्नचिन्ह या कुटुंबांसमोर आहे. पैसे अडकून पडणारत्यातच अन्नसुरक्षा योजनेचे अनुदान घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडावे लागत आहे. जर चार माणसांचे कुटुंब असेल, तर किमान दोन हजार रुपये केवळ बचत खात्यात या पोटावर हात असणाऱ्या लोकांचे अडकून पडणार आहेत. किमान बॅलन्सची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे झिरो बॅलन्सवर बँकिंग व्यवहार सुरू राहावेत, तसेच बँका खात्यावर रक्कम ठेवण्याची मनमानी करीत असतील तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.