शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

शिरोळचा अटकेपार झेंडा

By admin | Updated: July 31, 2014 00:51 IST

विविध घटनांमुळे चर्चेत : 'दत्त'ची निवडणूक बिनविरोध, खेळाडूंचे यश

संदीप बावचे / जयसिंगपूरराष्ट्रकुल स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी दाखवलेली चमक, कारखान्याच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झालेली ‘दत्त’ची निवडणूक, आगामी विधानसभेसाठी कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी केलेली मागणी, कर्जमाफीवरून ‘स्वाभिमानी’ व ‘राष्ट्रवादी’ यांच्यात रंगलेला कलगीतुरा, तर शिवसेनेने राबविलेली ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ मोहीम, अशा घटनांमुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा चर्चेत राहिला. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील चार खेळाडूंनी अटकेपार झेंडा लावला. यामध्ये घालवाडच्या राही सरनोबत हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले, तर वेटलिफ्टिंग प्रकारात हॅट्ट्रिक साधत कुरुंदवाडच्या गणेश माळी, ओंकार ओतारी व चंद्रकांत माळी यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी करून इतिहास घडविला आहे. त्यांनी तालुक्याचे नाव सातासमुद्रापार चमकाविले असून, खेळाडूंच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करून आ. डॉ. सा. रे. पाटील यांनी आपल्या कौशल्याची छाप पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील त्यांनी मुत्सद्दी खेळी करून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे नुकताच कॉँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. पश्चिम महाराष्ट्राचे पक्षनिरीक्षक रमाकांत खलप यांच्याकडे कॉँग्रेसमधील अनेकांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली. मेळाव्यात कॉँग्रेसचा उमेदवार ताकदवान असेल, अशीही घोषणा खलप यांनी यावेळी केली असली तरी आ. सा. रे. पाटील हे निवडणूक लढविणार का, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. मात्र, आ. सा. रे. पाटील सांगतील तोच उमेदवार विधानसभा निवडणुकीत असणार आहे. कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादीतील कलगीतुरा चांगलाच रंगला. लोकसभेत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ खा. शेट्टी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी दिला होता, तर खा. शेट्टी यांनी तथाकथित कर्जबुडव्या नेत्यांचे बिंग फुटेल, या भीतीपोटी खोटी पत्रकबाजी सुरू असल्याची टीका केली होती. खा. शेट्टींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणारे सध्या गायब झाले असून, ‘स्वाभिमानी’च्या गोटातही शांतता पसरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेने शिरोळ तालुक्यात ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत सदस्य नोंदणी अभियान राबविले. मात्र, या अभियानात तालुक्यातून किती सदस्यांची नोंदणी झाली, याची माहिती मात्र शिवसैनिकांना देता आली नाही. एकूणच अशा अनेकविध घटनांमुळे शिरोळ तालुका चांगलाच चर्चेत राहिला.