शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘झिंगाट’वर तरुणाई ‘सैराट’

By admin | Updated: September 17, 2016 00:31 IST

२५ तास मिरवणूक : ‘तेजाब’, ‘डॉन’मधील गाण्यांचीही चलती

कोल्हापूर : नव्या जुन्या, पारंपरिक आणि रिमिक्स गाण्यांच्या तालावर कोल्हापूरची तरुणाई सलग २५ तास थिरकत असल्याचे चित्र गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दिसून आले. मात्र, एकूणच मिरवणुकीवर ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याचा प्रभाव राहिला. मोठ-मोठ्या डॉल्बीच्या भिंती आणि त्यावर दणाणणारी गीते हे कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य राहिले आहे. प्रत्येक वर्षी असे एखादे गाणे त्यावेळची मिरवणूक तरुणांसाठी संस्मरणीय करते असे आतापर्यंतचे चित्र आहे. यावर्षी ‘झिंगाट’च्या गाण्यावर सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ताल धरल्याचे दिसत होते. हे गाणे रिमिक्स केल्याने तर कार्यक र्त्यांचा उत्साह वाढत होता. ‘तेजाब’मधील ‘एक दोन तीन...’पासून ते ‘मैं हूँ डॉन...’, ‘किसमें कितना हैं दम...’, ‘मेरे कॉलेज की एक लडकी हैं...’, ‘बचना ये हसींनो...’, ‘देवा श्रीगणेशा...’, ‘रेशमाच्या रेघांनी...’, ‘गढूळाच्या पाणी...’पर्यंत अनेक गाण्यांनी उपस्थितांना डोलायला लावले. अवधूत गुप्तेंच्या ‘माझं कोल्हापूर’ या गाण्यावरही अनेकांची पावले थिरकत होती. शिवरायांवरील मालिकेचे शीर्षक गीत, ‘प्यार करे सार्इंसे...’, गणपतीच्या आरत्या इथंपासून अगदी ‘अश्विनी ये ना...’, ‘शांताबाई...’ आणि ‘ब्राझील...’पर्यंतच्या गाण्यांनी मिरवणूक मार्ग दणाणून गेला होता. ज्यावेळी डॉल्बी बंद केली जात होती तेव्हा ढोलताशाच्या तालावरही नृत्य करण्याचा आनंद तरुणाईने लुटला. (प्रतिनिधी)तालमींची स्वत:ची गाणीशहरातील बहुतांशी बड्या तालमींनी आणि मंडळांनी स्वत:ची गाणी तयार करून घेतली होती. त्यामुळे पीटीएम, वाघाची तालीम, बीएमजी, दयावान, हिंदवी, राजे संभाजी, यु के बॉईज, रंकाळावेस यासारख्या मंडळांच्या गाण्यांवर कार्यकर्ते अधिक जोशात थिरकताना दिसत होते.