शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युसूफ पीरजादे, दीपक पोवार यांची बाजी

By admin | Updated: January 29, 2016 00:27 IST

राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा : निवृत्ती चौक रिक्षा मंडळातर्फे आयोजन

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नवीन गटात युसूफ पीरजादे (बेळगाव), तर जुन्या गटात दीपक मोरे (कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक मिळवीत बाजी मारली. दरवर्षीप्रमाणे यंदाही निवृत्ती चौक, शिवाजी पेठ येथे आयोजित केलेल्या या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरसह सातारा, पुणे, बेळगाव, बार्शी, सांगली, मिरज, आदी ठिकाणांहून रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : नवीन गट - युसूफ पीरजादे (बेळगाव) प्रथम; तर इम्रान खलिफा, अनिकेत पोवार (दोघेही कोल्हापूर) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. उत्तेजनार्थ इस्माईल मिर्जा (मिरज) यांना, तर जुन्या गटात दीपक पोवार (कोल्हापूर), अनुप पायगुडे (पुणे), मुस्ताक पेंटर (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवीत बाजी मारली. या गटात उत्तेजनार्थ सिद्धार्थ कांबळे (कोल्हापूर) यांना गौरविण्यात आले. ही स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे घेतली जाते. यंदा शीतल माळकर, अर्जुन दावणे या रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, विजय पाटील, नीलेश कदम, किरण पडवळ, चंद्रकांत भोसले, संयोजक राजू जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण विलास गवळी, मनोज दरे, भालचंद्र काणे यांनी केले. यावेळी दोन चाकांवर व रिव्हर्स रिक्षा चालविण्याची प्रात्यक्षिके संतोष जाधव(सांगली) यांनी करून दाखविली. स्पर्धेसाठी सतीश पाटील, सुनील मगदूम, उदय देशमाने, सचिन पोवार, गणेश कुलकर्णी, राजू कापूसकर, वसंत पाटील, देवराज पाटील, संजय माळी, शानाप्पा जावळे, गणेश पोतदार, सुनील गुरव, भरत पाटील, श्रीकांत चिले, शेखर जाधव, आदींनी परिश्रम केले. (प्रतिनिधी)